coronavirus: राज्यात आज सापडले कोरोनाचे ११ हजार १११ नवे रुग्ण, साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 10:21 PM2020-08-16T22:21:44+5:302020-08-16T22:33:15+5:30

राज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

coronavirus: 11,111 new corona Positive patients found in the Maharashtra today | coronavirus: राज्यात आज सापडले कोरोनाचे ११ हजार १११ नवे रुग्ण, साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन

coronavirus: राज्यात आज सापडले कोरोनाचे ११ हजार १११ नवे रुग्ण, साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन

Next
ठळक मुद्देराज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळीदिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात ८ हजार ८३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली

मुंबई  - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग कायम असून, आजही राज्यात १० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहे. राज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.  मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात ८ हजार ८३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार  आज राज्यात ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. 

राज्यातून आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,१११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील असा आहे. (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०१० (४७), ठाणे- १६६ (२), ठाणे मनपा-२०६ (६),नवी मुंबई मनपा-३८४ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२), उल्हासनगर मनपा-२५ (७), भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१), मीरा भाईंदर मनपा-१४० (८), पालघर-२३१ (१), वसई-विरार मनपा-१६० (३), रायगड-२४५ (५), पनवेल मनपा-१५३ (१), नाशिक-१६० (२), नाशिक मनपा-४७८ (६), मालेगाव मनपा-४१, अहमदनगर-१९९ (१),अहमदनगर मनपा-९५ (९), धुळे-२४ (७), धुळे मनपा-२९ (२), जळगाव-४६९ (७), जळगाव मनपा-१२९, नंदूरबार-६, पुणे- ६४४ (१२), पुणे मनपा-१५३९ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९), सोलापूर-१७७ (५), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-१९८ (८), कोल्हापूर-२९५ (२९), कोल्हापूर मनपा-२२३ (७), सांगली-१७४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९), सिंधुदूर्ग-४, रत्नागिरी-६१ (३), औरंगाबाद-६८ (१),औरंगाबाद मनपा-७२ (३), जालना-७८, हिंगोली-४५, परभणी-२७, परभणी मनपा-४९ (१), लातूर-१२१ (१), लातूर मनपा-११६, उस्मानाबाद-१२७ (२), बीड-८५ (१), नांदेड-५० (३), नांदेड मनपा-१६, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१३ (१), अमरावती-४०, अमरावती मनपा-६४ (२), यवतमाळ-५४, बुलढाणा-५९ (३), वाशिम-२५, नागपूर-१३९ (३), नागपूर मनपा-५५२ (१३), वर्धा-१०, भंडारा-२२ (१), गोंदिया-१४ (१), चंद्रपूर-२४ (१), चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-३, इतर राज्य २० (१). 

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: coronavirus: 11,111 new corona Positive patients found in the Maharashtra today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.