CoronaVirus: चिंता वाढली! दिवसभरात राज्यात ११३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या ७४८वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 08:18 PM2020-04-05T20:18:25+5:302020-04-05T21:11:16+5:30

कस्तुरबा रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांसोबत तो एचआयव्ही बाधितही होता. 

 CoronaVirus: 113 new patients diagnosed in the state; Total patient numbers at 748 vrd | CoronaVirus: चिंता वाढली! दिवसभरात राज्यात ११३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या ७४८वर

CoronaVirus: चिंता वाढली! दिवसभरात राज्यात ११३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या ७४८वर

Next

मुंबई -  राज्यात मागील २४ तासांत ११३  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८  झाली आहे. परिणामी, कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे नवे आव्हान शासनासमोर उभे राहिले आहे. रविवारी राज्यभरात एकाच तीन दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे. राज्यात एकूण ४५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद  येथील आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६,५८६  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 
.....................................................

१० लाखांहून अधिक जणांचे सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.  

..........................

बळींची संख्या ४५ वर

राज्यात रविवारी एकाच दिवशी तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुळे ओढावलेल्या मृतांचा आकडा ४५ वर जाऊन पोहोचला आहे. त्यात रविवारी झालेल्या मृत्यूंत केईएममध्ये मुंबईच्या ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला, त्याला कोणत्याही प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५८ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औंध येथे रविवारी दुपारी ७७ वर्षीय आत्यंतिक स्थूल महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती.

........................................................

जिल्हा/मनपा              बाधित रुग्ण              मृत्यू

मुंबई                    ४५८                     ३०

पुणे शहर/ग्रामी      ण          १००                     ०५

सांगली                   २५                      ०

ठाणे मंडळ मनपा          ८२                      ०६

नागपूर                   १७                      ०

अहमदनगर               २१                      ०

लातूर                    ०८                      ०

औऱंगाबाद                ७                       १

बुलढाणा                  ५                       १

यवतमाळ,उस्मानाबाद       प्रत्येकी ४                ०

सातारा                   ३                       ०

कोल्हापूर,रत्नागिरी,जळगाव  प्रत्येकी ३                ०१(जळगाव)

सिंधुदुर्ग,गोंदिया,नाशिक,

वाशिम,अमरावती,हिंगोली    प्रत्येकी १                ०१(अमरावती)

अन्य राज्य               २                       ०

एकूण                    ७४८                     ४५   

 

Web Title:  CoronaVirus: 113 new patients diagnosed in the state; Total patient numbers at 748 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.