coronavirus: राज्यात नवीन १२३० कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण २३,४०१   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:40 AM2020-05-12T06:40:05+5:302020-05-12T06:41:43+5:30

मुंबई : राज्यात सोमवारी १२३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ...

coronavirus: 1230 new coronavirus cases registered in the state, total patients 23,401 | coronavirus: राज्यात नवीन १२३० कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण २३,४०१   

coronavirus: राज्यात नवीन १२३० कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण २३,४०१   

Next

मुंबई : राज्यात सोमवारी १२३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ५८७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल ४,७८६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दिवसभरात राज्यात ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २३ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. या ३६ मृत्यूंपैकी तब्बल १७ जणांचे वय साठहून अधिक होते. १६ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. तर, तीन जण ४० वर्षांखालील आहेत. आज ३६ मृतांपैकी २७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृतांमध्ये मुंबईमध्ये २०, सोलापूर शहर ५, पुणे ३, ठाणे २, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, वर्धा जिल्हा आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एकाचा मुंबईत बळी गेला आहे.

आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २,१८,९१४ नमुन्यांपैकी १,९३,४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २३,४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १,२५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. सोमवारी एकूण १२,०२७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५३.७१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

देशात ४२१३ नवीन रुग्ण
24 तासांमध्ये देशात नव्या ४२१३ रुग्णांची नोंद झाली. काही राज्ये माहिती देण्यास विलंब करीत असल्याने एका दिवसात हा आकडा वाढलेला दिसतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.१५% आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपवरून कुणाचीही खासगी माहिती केंद्राकडे जमवली जात नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. हे अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे, लोकांना सतर्क करणे, त्यांना कोरोनापासून वाचवणे हेच आरोग्य सेतू अ‍ॅपच्या निर्मितीमागचे हेतू आहेत.

284000 जगभरात मृत्यू

कोरोनाने जगभरात आतापर्यंत२ लाख ८४ हजार ७३४ जणांचा बळी घेतला असून, एकट्या अमेरिकेतच ८० हजार ८४६ जण मरण पावले आहेत. आतापर्यंत १५ लाख ६ हजार ४७९ जण बरेही झाले आहेत. मात्र चार दिवसांपासून रशियात रुग्णांची संख्या १० ते ११ हजारांनी वाढत असून, तेथील रुग्णसंख्या आता सुमारे २ लाख २१ हजारांवर गेली आहे. अमेरिकेत १३ लाख ७० हजार रुग्ण आहेत.

Web Title: coronavirus: 1230 new coronavirus cases registered in the state, total patients 23,401

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.