Coronavirus: राज्यात आतापर्यंत १३ लाख ३० हजार रुग्ण कोविडमुक्त; गुरुवारी १०,२२६ रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 03:59 AM2020-10-16T03:59:10+5:302020-10-16T03:59:48+5:30

सध्या राज्यात २३ लाख २७ हजार ४९३ व्यक्ती घरगुती, तर २३,१८३ संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Coronavirus: 13 lakh 30 thousand patients free from covid so far in the state; Diagnosis of 10,226 patients on Thursday | Coronavirus: राज्यात आतापर्यंत १३ लाख ३० हजार रुग्ण कोविडमुक्त; गुरुवारी १०,२२६ रुग्णांचे निदान

Coronavirus: राज्यात आतापर्यंत १३ लाख ३० हजार रुग्ण कोविडमुक्त; गुरुवारी १०,२२६ रुग्णांचे निदान

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात १३ हजार ७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण १३ लाख ३० हजार ४८३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.०४ टक्क्यांवर आले आहे. सध्या राज्यात १ लाख ९२ हजार ४५९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात गुरुवारी कोरोनाचे १० हजार २२६ रुग्णांचे निदान झाले असून ३३७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ६४ हजार ६१५ झाली असून बळींचा आकडा ४१ हजार १९६ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २३ लाख २७ हजार ४९३ व्यक्ती घरगुती, तर २३,१८३ संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Web Title: Coronavirus: 13 lakh 30 thousand patients free from covid so far in the state; Diagnosis of 10,226 patients on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.