CoronaVirus राज्यात आणखी १४ बळी; ७४८ पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:36 AM2020-04-06T06:36:38+5:302020-04-06T06:36:58+5:30

२४ तासांत ११३ रुग्णांची भर : वाढता संसर्ग रोखण्याचे राज्य सरकारसमोर आव्हान

CoronaVirus 14 more death due to corona in maharashtra, 748 positive hrb | CoronaVirus राज्यात आणखी १४ बळी; ७४८ पॉझिटिव्ह

CoronaVirus राज्यात आणखी १४ बळी; ७४८ पॉझिटिव्ह

Next

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ११३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७४८ झाली आहे. कोरोनावर नियंत्रणाचे नवे आव्हान सरकारसमोर उभे आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शनिवारी ३२ होती. रविवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ४६ वर जाऊन पोहोचला.
आजपर्यंत पाठविलेल्या १६,००८ नमुन्यांपैकी १४,८३७ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले, तर ७४८ पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या ४६,५८६ घरगुती अलगीकरणात तर ३१२२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.


१० लाखांहून अधिक जणांचे सर्वेक्षण
राज्यात जिथे रुग्णांचे क्लस्टर सापडले तिथे केंद्राच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात यासाठी ५१९ टीम तर पुणे महापालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपामध्ये २१० टीम सर्वेक्षण करत आहेत. नवी मुंबईत १९६ टीम नियुक्त आहेत. एकूण ३,०७८ पथके कार्यरत असून त्यांनी १० लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले.
एकाच दिवसात तिघांचा मृत्यू
राज्यात रविवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात केईएममध्ये मुंबईच्या ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५८ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औंध येथे रविवारी दुपारी ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती.


देशात ५०५ नवे रुग्ण, ७ जणांचे बळी
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या रविवारी ८३, रुग्णांची संख्या ४,२२४ तर गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ५०५ नवे रुग्ण नोंद झाले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. गेल्या २४ तासांत आजाराने सात जणांचा मृत्यू झाला तर २७४ जण एक तर बरे झाले वा त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. वृत्तसंस्थेने राज्यांच्या आकडेवारीच्या आधारे म्हटले की, देशात किमान ११० जणांचा मृत्यू झाला. ३,९५९ जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ३०६ जण एक तर बरे झाले आहेत वा त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली गेली आहे.


70,000
रुग्ण जगात वाढले

नवी दिल्ली : जगात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत ७० हजारांनी वाढ झाली असून एकूण रुग्णांचा आकडा १२ लाख, ५४ हजार एवढा झाला आहे. एकूण मृतांची संख्या ६६ हजार, ५०० झाली असून सध्या ९ लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत सुमारे ६ हजार नवे रुग्ण आढळले आणि मृतांच्या संख्येत ६२०ने वाढ झाली. तेथील मृतांचा आकडा ५ हजाराच्या घरात गेला आहे. अमेरिकेतील रुग्णांचा संख्याही ३ लाख, १५ हजारांवर गेली असली तरी २४ तासांत ८५० नवे रुग्ण आढळले. तेथील मृतांचा आकडा ८ हजार, ५००वर गेला आहे. अन्य देशांतील मृतांची संख्या पुढीलप्रमाणे इटली (१५,५००), स्पेन (१२,५००), फ्रान्स (७,६००) आणि इराण (३,६०३).

Web Title: CoronaVirus 14 more death due to corona in maharashtra, 748 positive hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.