Coronavirus: राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:40 AM2020-05-05T02:40:19+5:302020-05-05T06:56:54+5:30

दिवसभरात ७७१ रुग्ण, तर ३५ मृत्यूंची नोंद,

Coronavirus: 14 thousand 541 coronavirus patients in the state; The number of victims is 583 | Coronavirus: राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

Coronavirus: राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

Next

मुंबई : राज्यात सोमवारी ७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात सोमवारी ३५ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ५८३ झाला आहे. तर मुंबईत सोमवारी ५१० कोरोना बाधितांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ९ हजार ३१० इतकी झाली आहे. तर दिवसभरात १८ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ३६१ झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कोरोनाचे सावट अधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईमधील १८, पुण्यातील ७, अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यातील १, औरंगाबाद शहरातील १, ठाणे शहरातील १ आणि नांदेड शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू सोमवारी मुंबईत झाला. दिवसभरात ३५० जणांना डिस्चार्ज मिळाला असून आजपर्यंत राज्यातून २,४६५ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. राज्यात सोमवारी नोंद झालेल्या ३५ मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. ३५ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत.

लोक होम क्वारंटाइन
सध्या राज्यात १,९८,०४२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३,००६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,७६,३२३ नमुन्यांपैकी १,६२,३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १०२६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण १०,८२० सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे.

राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहे. त्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. गावी जाण्याच्या परवानगीसाठी स्थलांतरित मजुरांनी सोमवारी मालाड येथे पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेली रांग.

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असली, तरी सर्वाधिक रुग्णही बरे झालेत. रविवारी १०७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १२८४२ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण २६.५२ टक्के आहे. पंधरा दिवसांपूर्वी ते १४ टक्के होते. सध्या देशात ४६, ४३७ रुग्ण असून त्यातील २९४५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जगात एकूण रुग्णांची संख्या ३६ लाखांवर गेली असून, मृतांचा आकडा २ लाख ५0 हजारांवर म्हणजेच अडीच लाखांच्यावर
पोहोचला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्याच ६८ हजारांवर आहे. आशियातील ४८ देशांत असलेल्या ५ लाख ६६ हजार ४६० पैकी २ लाख ९८ हजार २१७ रुग्ण बरे झाले आहेत. आशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. आशियात मृतांचा आकडा १९,७७८ असून त्यापैकी सुमारे १५ हजार रुग्ण इराण, चीन आणि तुर्कस्थानातील आहेत.

Web Title: Coronavirus: 14 thousand 541 coronavirus patients in the state; The number of victims is 583

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.