CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:21 AM2021-03-16T02:21:48+5:302021-03-16T06:57:41+5:30

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events | CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

Next

मुंबई: कोरोनाचा (CoronaVirus ) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर आजपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात बंदी असेल, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी काढला. विवाह समारंभ केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.  (CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events)

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच त्यांचे व्यवस्थापन, मालक व आयोजकांवरही कारवाई केली जाईल. याशिवाय, आणखी काही कडक बंधने लावण्यात आली आहेत. त्यानुसार, अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही. धार्मिक स्थळांमध्ये उपलब्ध जागा आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून भक्तांना प्रवेश द्यावा. दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सोय करून गर्दीचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरची व्यवस्था धार्मिक स्थळांमध्ये अनिवार्य असेल.

सर्व चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ५० टक्के उपस्थितीत आणि काही बंधंनाचे पालन करीतच चालवण्यास अनुमती असेल. त्या ठिकाणी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नसेल. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश मिळता कामा नये यासाठी आवश्यक ती तपासणी यंत्रणा असणे अनिवार्य राहील. सॅनिटायझेशनची पुरेशी व्यवस्था करावी लागेल. प्रत्येक जण मास्क घालून आलेला आहे की नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे की नाही हे बघण्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग तैनात करावा लागेल. या नियमांचे उल्लंघन करणारी चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ही केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझेशन, अंगातील ताप तपासणी यंत्रणा याबाबतचे नियम हे शॉपिंग मॉल्ससाठीही लागू राहतील आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

गृह विलगीकरणात असलेल्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली जावी. गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावण्यात यावा जेणेकरून तेथे कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे कळेल. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का असावा. अशा रुग्णाच्या कुटुंबियांनीही त्यांचा वावर मर्यादित ठेवावा, मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

कार्यालयांत ५० टक्केच उपस्थिती
आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणारे कार्यालय हे केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच उपस्थिती 
- विवाह समारंभाला ५० जणांच्याच उपस्थितीचे बंधन 
- अंत्यविधीला २० पेक्षा 
अधिक जण नकाेत
- कार्यालयांमध्ये केवळ 
५० टक्के कर्मचारी उपस्थिती 
- गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावावा 

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. नागरिकांनीही गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. 
    - राजेश टोपे, आरोग्यमंत्री 
 

Web Title: CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.