CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे; दिवसभरात विक्रमी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 11:09 PM2020-09-06T23:09:45+5:302020-09-06T23:11:10+5:30
CoronaVirus News: कोरोना रुग्ण वाढीचा धडकी भरवणारा वेग; गेल्या ६ दिवसांत १ लाख १४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले
मुंबई– ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ हजारांच्या टप्प्यात वाढली आहे. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल १ लाख १४ हजार ३६० रुग्णांची नोंद झाली असून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. राज्यात आज २३ हजार ३५० रुग्णांची नोंद झाली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ९ लाखांच्या पुढे गेला.
23,350 new #COVID19 cases, 7,826 recoveries and 328 deaths reported in Maharashtra today. Total number of cases rise to 9,07,212 including 6,44,400 discharges, 2,35,857 active cases and 26604 deaths: State Health Department
— ANI (@ANI) September 6, 2020
राज्यात आतापर्यंत ९ लाख ७ हजार २१२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे ३२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात ७ हजार ८२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात २ लाख ३५ हजार ८५७ जणांवर उपचार सुरू असून कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ६ लाख ४४ हजार ४०० इतकी आहे.
1,910 new #COVID19 cases, 911 recoveries & 37 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases increases to 1,55,622 in Mumbai, including 23,930 active cases, 1,23,478 recovered cases & 7,866 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC). #Maharashtrapic.twitter.com/XOY6V9mJqr
— ANI (@ANI) September 6, 2020
मुंबईत आता १ हजार ९१० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १ लाख ५५ हजार ६२२ वर पोहोचला. आज मुंबईत ३७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा ७ हजार ८६६ वर पोहोचला. शहरात सध्याच्या घडीला २३ हजार ९३० जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ लाख २३ हजार ४७८ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यातील ९११ जण आज बरे होऊन घरी परतले.