CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 08:45 PM2020-04-09T20:45:27+5:302020-04-09T20:47:08+5:30

कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे.

CoronaVirus: 24x7 helpline to address mental health concerns during Covid-19 pandemic | CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

Next

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपण सगळेच सहभागी झालो आहोत. घरातच राहून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करतोय. या लॉकडाऊनच्या काळात दिवसभर कुटुंबीयांसोबत राहायला मिळत असल्याचा आनंद असला, तरी प्रत्येकाच्याच मनात एक भीतीही आहे. हे असं संकट आपल्यावर किंवा देशावरच नव्हे, तर जगावर पहिल्यांदा ओढवलं आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येकालाच भक्कम मानसिक आधाराची गरज आहे. ती ओळखूनच मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'एमपॉवर'ने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेच्या साथीने नागरिकांसाठी ‘बीएमसी-एमपॉवर वनऑनवन’ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. 

कोरोनामुळे मानसिक तणावाखाली असलेली राज्यातील कुणीही व्यक्ती 1800-120-820050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अनुभवी समुपदेशकांचा किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन घेऊ शकते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही सेवा उपलब्ध असेल.

राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. कोरोना नावाच्या संकटामुळे मनाने खचून गेलेल्या, भविष्याच्या काळजीने अस्वस्थ झालेल्या व्यक्तींनी या हेल्पलाईनचा आवर्जून फायदा घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.    
  
एमपॉवर ही देशभरातील मानसिक आरोग्यविषयक समस्यांशी लढणारी आघाडीची संस्था आहे. आजच्या निराशाजनक वातावरणात नागरिकांना मनाने खंबीर करण्याच्या उद्देशानं या संस्थेच्या अध्यक्ष नीरजा बिर्ला यांनी राज्य सरकार आणि महापालिकेशी समन्वय साधून ही 24x7 हेल्पलाईन सुरू केली आहे.   

Web Title: CoronaVirus: 24x7 helpline to address mental health concerns during Covid-19 pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.