CoronaVirus: राज्यात ४३१ नवे बाधित; एकूण ५६४९

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:58 AM2020-04-23T04:58:55+5:302020-04-23T04:59:54+5:30

आतापर्यंत राज्यात ७८९ रुग्ण बरे झाले. एकूण ४,५९१ रुग्णांवर उपचार सुरू

CoronaVirus 431 new patient found in maharashtra takes toll to 5649 | CoronaVirus: राज्यात ४३१ नवे बाधित; एकूण ५६४९

CoronaVirus: राज्यात ४३१ नवे बाधित; एकूण ५६४९

Next

मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाबाधित ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या ५,६४९ गेली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडले आहे. आतापर्यंत राज्यात ७८९ रुग्ण बरे झाले. एकूण ४,५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बुधवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात मृत्यूंची संख्या आता २६९ झाली आहे. आजच्या मृत्यूंमध्ये मुंबईचे १२, पुण्याचे ३, ठाणे मनपामधील २, तर सांगली येथील १ आणि पिंपरी-चिंचवड येथील १ रुग्ण आहे. १ लाख ९ हजार ७२ जण होम क्वारंटाइन असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबईत १० मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा १६१ वर गेला आहे. तर एकूण बाधित ३६८३ आहेत.

राज्यातील एका मंत्र्याला कोरोनाची लागण
राज्य मंत्रिमंडळातील एका महत्त्वाच्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. सदर मंत्री काही दिवसांपूर्वीच राहत्या घरी अलगीकरणात होते. मात्र बुधवारी ताप आल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

विदर्भ : रुग्णसंख्या १५४; नागपूर शंभरीकडे
विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बुधवारी आणखी सहा नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. तर विदर्भात रुग्णांची संख्या १५४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसात नागपूर वगळता इतर जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुणे : ५७ रुग्णांची वाढ; चार जणांचा मृत्यू
पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नित्याने वाढत असून, आज यामध्ये ५७ जणांची वाढ झाली आह़े़ शहरातील विविध हॉस्पिटलमधून आलेल्या आकडेवारीनुसार आजपर्यंत पुणे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ७६५ झाली आहे़ तर आज चार रूग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत ५७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.

Web Title: CoronaVirus 431 new patient found in maharashtra takes toll to 5649

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.