CoronaVirus: मराठवाड्यात ४५ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू; उपचारानंतर १३ जण निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:42 AM2020-04-19T03:42:17+5:302020-04-19T03:42:41+5:30

उपचारानंतर एकुण १३ जण निगेटिव्ह झाले आहेत. अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus 45 persons are corona positive in Marathwada three died | CoronaVirus: मराठवाड्यात ४५ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू; उपचारानंतर १३ जण निगेटिव्ह

CoronaVirus: मराठवाड्यात ४५ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू; उपचारानंतर १३ जण निगेटिव्ह

Next

औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, एकुण ४५ पॉझिटिव्ह आढळले असून तिघांचा बळी गेला आहे. उपचारानंतर एकुण १३ जण निगेटिव्ह झाले आहेत. अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद शहरातील ६५ वर्षीय महिलेचा शनिवारी घाटी इस्पितळात मृत्यू झाला. तेरा दिवसांतील शहरातील हा तिसरा बळी आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. दोघे उपचारांनी बरे झाले आहेत. २३ जण शासकीय रुग्णालयात तर एक जण खाजगी इस्पितळात उपचार घेत आहे. जालना जिल्ह्यात एकुण दोन पॉझिटिव्ह आहेत. ६५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्या पतीसह इतर १६ जणांना क्वारंटाइन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील सर्व १५६ कोरोना संशयितांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यात केवळ आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एकमेव पॉझिटिव्ह आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात बाहेरून आलेल्या तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी रात्री त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परभणी जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह आहे. हिंगोली जिल्ह्यात आढळलेला एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. नांदेड जिल्ह्यात सुदैवाने आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही़ लातूरमध्ये एका पॉझिटिव्ह आढळला.

Web Title: CoronaVirus 45 persons are corona positive in Marathwada three died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.