CoronaVirus News: कोरोनामुळे राज्यातील ४५ पोलिसांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:33 AM2020-06-18T02:33:58+5:302020-06-18T02:34:08+5:30

१ हजार ३३ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू

CoronaVirus 45 policemen died in state due to corona | CoronaVirus News: कोरोनामुळे राज्यातील ४५ पोलिसांचा मृत्यू 

CoronaVirus News: कोरोनामुळे राज्यातील ४५ पोलिसांचा मृत्यू 

Next

मुंबई : राज्यभरात कोरोनामुळे बुधवारी पहाटेपर्यंत ४५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ३३ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.      

राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा कमी होत असला तरी संकट कायम आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या राज्यातील ४५ पोलिसांपैकी २९ जण मुंबई पोलीस दलातील आहेत. मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोन हजारांहून अधिक आहे. यात बाराशेहून अधिक पोलिसांनी कोरोनावर मात केली असून काही जण पुन्हा सेवेत दाखल झाले.

कामाचा ताण वाढला
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर स्ट्रीट क्राईमनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हानही पोलिसांवर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. जीव धोक्यात घालून पोलीस आरोपींना पकडत जरी असले तरी, आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने पोलिसांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ ओढावत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच कुर्ला पोलिसांनी लुटीच्या गुन्ह्यात चौकडीला अटक केली. त्यात एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला पकडणाऱ्या पोलिसांना क्वॉरंटाईन व्हावे लागले. यापूर्वी बांगुरनगर पोलीस ठाण्यातही असाच प्रकार घडला होता.

सव्वा लाख गुन्ह्यांची नोंद
राज्यभरात पोलिसांकडून विनाकारण घराबाहेर पडणे, नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी १ लाख ३१ हजार ३७७ गुन्हे नोंद झाले आहेत. तर विविध कारवाईत ८२ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. बंदोबस्तादरम्यान पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी २६८ गुन्हे नोंद झाले असून ८५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: CoronaVirus 45 policemen died in state due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.