CoronaVirus News: दिवसभरात ५०७१ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईतील सर्वाधिक ४२४२

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:19 AM2020-06-16T05:19:15+5:302020-06-16T06:38:20+5:30

आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे

CoronaVirus 5071 corona patients discharged in a day | CoronaVirus News: दिवसभरात ५०७१ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईतील सर्वाधिक ४२४२

CoronaVirus News: दिवसभरात ५०७१ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईतील सर्वाधिक ४२४२

Next

मुंबई : राज्यात पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोनामुक्त रुग्णांना इस्पितळातून सुट्टी मिळाली. सोमवारी ५ हजार ७१ रुग्णांना घरी पाठविले असून, मुंबईतील संख्या ४२४२ आहे. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ४७.२ टक्के आहे. यापूर्वी २९ मे रोजी ८३८१ रुग्णांना घरी पाठविले होते.

आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबईतील ४२४२ (आतापर्यंत ३९, ९७६), पुणे मंडळात ५६८ (एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (एकूण ८११) रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

जगभरातील स्थिती
80,31,000 एकूण रुग्ण
4,36,000 आतापर्यंत मृत्यू
41,49,000 बरे झालेले

भारतातील स्थिती
3,32,424 एकूण रुग्ण
9,502 मृत्यू
1,69,000 बरे झालेले

Web Title: CoronaVirus 5071 corona patients discharged in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.