Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात ५७ हजार ६४० नवे कोरोनाबाधित तर ९२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:24 PM2021-05-05T20:24:31+5:302021-05-05T20:24:47+5:30
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबई – राज्यात आज ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ४१ लाख ६४ हजार ०९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३२% एवढे झाले आहे. आज राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तसेच राज्यात आज ९२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ५२ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३२ हजार १७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्याचसोबत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ४१ हजार ५९६ इतकी आहे.
Maharashtra reports 57,640 fresh COVID19 positive cases, 57,006 discharges, and 920 deaths
— ANI (@ANI) May 5, 2021
Total cases: 48,80,542
Total active cases: 6,41,596
Total recoveries: 41,64,098
Death toll: 72,662 pic.twitter.com/79SuP8SkwQ
आज राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ झाली आहे.
राज्यातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे
मुंबईसह ठाणे विभाग - १०२९२
नाशिक विभाग – ९११६
पुणे विभाग – १३४९०
कोल्हापूर विभाग - ४०७२
औरंगाबाद विभाग - २६६४
लातूर विभाग - ३८७४
अकोला विभाग - ५८९८
नागपूर एकूण - ८२३४
राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे
मुंबई – ५६ हजार १५३
ठाणे – ४४ हजार ७१६
पुणे – १ लाख १४ हजार २५४
सातारा – २१ हजार ०२५
नाशिक – ४६ हजार ५४१
पालघर – १८ हजार ३६०
औरंगाबाद – ११ हजार ५४९
बीड – १५ हजार ०३७
नागपूर – ५८ हजार ९४४
चंद्रपूर – २८ हजार १०५
बुलढाणा – १४ हजार ५३३
आज नोंद झालेल्या एकूण ९२० मृत्यूंपैकी ४१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८७ मृत्यू, पुणे-७९, नाशिक-६२, ठाणे-५३, नागपूर-१८, जळगाव-१२, नंदूरबार-१२, सोलापूर-१२, नांदेड-५, परभणी-५, रायगड-५, औरंगाबाद-४, वर्धा-४, हिंगोली-३, लातूर-३, अहमदनगर-२, चंद्रपूर-२, अमरावती-१, भंडारा-१, ज़ालना-१, उस्मानाबाद-१, सांगली-१ आणि वाशिम-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.