CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ६,४९७ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 09:55 PM2020-07-13T21:55:08+5:302020-07-13T21:55:43+5:30
आतापर्यंत १ लाख ४४ हजार जण कोरोनामुक्त; सध्या १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरु
मुंबई – राज्यात दिवसभरात ६ हजार ४९७ रुग्ण आणि १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ झाली असून बळींचा आकडा १० हजार ४८२ झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के तर मृत्यूदर ४.०२ टक्के झाला आहे.
राज्यात सोमवारी १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात मुंबईतील ४७, ठाणे ५, ठाणे मनपा २३, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा ४, वसई विरार मनपा ६, पनवेल मनपा ५, नाशिक १, नाशिक मनपा ९, अहमदनगर १, अहमदनगर १, धुळे मनपा २, जळगाव ७, जळगाव मनपा १, पुणे ५, पुणे मनपा २०, सोलापूर १, सोलापूर मनपा ६, सांगली १, सांगली मिरज कुपवाड मनपा २, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा २, लातूर २, उस्मानाबाद ३, अकोला २, अमरावती १, वाशिम १, नागूपर मनपा १ आणि भंडारा १ या रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत दिवसभरात १ हजार १५८ रुग्ण तर ४७ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या ९४ हजार १४६ झाली असून मृतांचा आकडा ५ हजार ३३५ झाला आहे. आतापर्यंत शहर उपनगरातील ६५ हजार ६२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या २२ हजार ९०० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. ठाण्यात ३४ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात एकूण बाधितांची संख्या ६३ हजार ७७८ आणि १ हजार ७०५ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ठाण्यातील २७ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३ लाख ८७ हजार ७९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.४३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ हजार ८७ हजार व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४१ हजार ६६० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.