Coronavirus : धोका वाढला! महाराष्ट्रात 117 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 04:01 PM2020-04-15T16:01:53+5:302020-04-15T16:28:34+5:30
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 च्या वर गेला आहे.
मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर पोहोचली आहे. बुधवारी ( 15 एप्रिल) राज्यात 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 66 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर पुण्यातही कोरोनाचे आणखी 44 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. आज मुंबईत 66, ठाण्यात 3, वसई-विरार आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एक, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढली आहे.
Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवरhttps://t.co/Hqr32Wocot#CoronavirusLockdown#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) April 15, 2020
देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 1000 तर जगात 4,86,247 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात 4,86,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,27,147 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,08,164 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 4,86,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुकhttps://t.co/UuRa6cRTft#coronaupdatesindia#Karnataka#technology
— Lokmat (@MiLOKMAT) April 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर
Coronavirus : वायू दुर्घटनेतून बचावले; पण 'त्या' 5 जणांना कोरोनाने गाठले
Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात
Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार
Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय