CoronaVirus News: राज्यातील ६६ हजार बालकांना कोरोनाची बाधा; ८५ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:03+5:302020-12-15T04:29:21+5:30

मुंबईत १० वर्षांखालील १७ लहानग्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर जवळपास पाच हजार लहानग्यांना कोरोनाची लागण झाली.

CoronaVirus 66000 children in the state infected with corona | CoronaVirus News: राज्यातील ६६ हजार बालकांना कोरोनाची बाधा; ८५ जणांनी गमावला जीव

CoronaVirus News: राज्यातील ६६ हजार बालकांना कोरोनाची बाधा; ८५ जणांनी गमावला जीव

Next

- स्नेहा मोरे

मुंबई : राज्यासह मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरीही मार्च महिन्यापासून डिसेंबरपर्यंतच्या (आजपर्यंत) काळात सुमारे ६६ हजार नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या लहानग्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील ८५ लहानग्यांना काेराेनामुळे जीव गमवावा लागला.

मुंबईत १० वर्षांखालील १७ लहानग्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर जवळपास पाच हजार लहानग्यांना कोरोनाची लागण झाली. १० ते १९ या वयोगटांतील ३१ लहान मुला-मुलींनी कोरोनामुळे जीव गमावला असून, १० हजार जणांना कोरोना झाला. ११ ते २० वयोगटांत १८१ मृत्यू झाले असून, एकूण मृत्युंच्या संख्येत हे प्रमाण ०.३८ टक्के आहे.

बालरोग तज्ज्ञ डॉ.सचिन पाटील यांनी सांगितले, कोरोनामुळे जीव गमावलेल्या लहानग्यांच्या मृत्यूचे कारण केवळ कोरोना नसून, अन्य आजारांनी निर्माण झालेली गुतांगुत हेही आहे. यात हृदयविकार, मेंदूशी निगडित आजार, क्षयरोग अशा काही आजारांचा समावेश आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येतील ११ टक्के रुग्ण लहान मुले आहेत. बऱ्याचदा बाल कोरोना रुग्ण हे लक्षणेविरहित असतात. मात्र, तरीही त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले पाहिजे.

वयोगट    मृत्युसंख्या    मृत्यूचे प्रमाण 
        (टक्केवारीत)
नवजात     ८५    ०.०१
बालक ते १०
११ ते २०    १८१    ०.३८
२१ ते ३०    ८४५    १.७
३१ ते ४०    २४५२    ५
४१ ते ५०    ५६७३    ११.९
५१ ते ६०    ११३८८    २३.८
६१ ते ७०    १४२८०    २९.८

Web Title: CoronaVirus 66000 children in the state infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.