CoronaVirus : राज्यात दिवसभरात 6695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7120 कोरोनामुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 09:21 PM2021-08-05T21:21:12+5:302021-08-05T21:21:50+5:30
CoronaVirus in Maharashtra : राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
राज्यात एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94), गोंदिया (95), गडचिरोली (31) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर भिवंडी निजामपूर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, हिंगोली, परभणी, अकोला महानगरपालिका, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या अकरा महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत दिवसभरात 324 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!
मुंबईत गेल्या 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,13,476 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4529 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1591 दिवसांवर गेला आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 283 रुग्ण
ठाणे जिल्ह्यातील महापालिका, गावपातळीवर 283 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 13 जणांचा मृत्यू गुरुवारी झाला आहे. ठाणे शहरात 59 रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. कल्याण डोंबिवलीला 83 रुग्ण वाढीसह तीन मृत्यू झाले. उल्हासनगरमध्ये सहा रुग्ण वाढ झाली असून दोन मृत्यू झालेत. भिवंडी परिसरात एकही रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला 19 रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. अंबरनाला सहा रुग्ण वाढले असून एक मृत्यू आहे. बदलापूरमध्ये 28 रुग्णांची आज वाढ असून एक मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील गावपाड्यात 24 रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे.