Coronavirus : राज्यात ८,०६७ जणांना कोरोनाची बाधा, मृत्युदर २.११ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:57 AM2022-01-01T05:57:13+5:302022-01-01T05:57:34+5:30
Coronavirus : राज्यात शुक्रवारपर्यंत एकूण ६५ लाख ९ हजार ९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.
मुंबई : राज्यात शुक्रवारी ८ हजार ६७ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.११ टक्के एवढा असून, ॲक्टिव्ह रुग्ण २४ हजार ५०९ एवढे आहेत. शुक्रवारी १ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात शुक्रवारपर्यंत एकूण ६५ लाख ९ हजार ९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे. शुक्रवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०, १५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ७८ हजार ८२१ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत पाच हजार ६३१ कोरोनाबाधित सापडले
गेल्या २४ तासांत मुंबईत पाच हजार ६३१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२० टक्क्यांवर पोहोचला आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ४४१वर पोहोचली आहे. शुक्रवारी एकाच बाधिताचा मृत्यू झाला आहे.