CoronaVirus News: महाराष्ट्रासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोना रुग्णांबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:25 AM2020-10-07T03:25:29+5:302020-10-07T06:42:38+5:30

CoronaVirus Maharashtra News: ११ लाख ७९ हजार जण कोविडमुक्त

CoronaVirus active number of corona cases decreases in state | CoronaVirus News: महाराष्ट्रासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोना रुग्णांबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर

CoronaVirus News: महाराष्ट्रासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोना रुग्णांबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर

Next

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात येत असून, दिवसागणिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यात सध्या २ लाख ४७ हजार २३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी राज्यात २ लाख ५२ हजार २७७, रविवारी २ लाख ५५ हजार २८१ तर शनिवारी २ लाख ५८ हजार १०८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली.

राज्यात सर्वाधिक ५८,८६८ सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल ठाण्यात ३१,००९ तर मुंबईत २६,००३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे. दिवसभरात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात मंगळवारी १२ हजार २५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३७० बळी गेले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ३८ हजार ७२७ आहे.

Web Title: CoronaVirus active number of corona cases decreases in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.