CoronaVirus: राज्यातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीनं चाचणीची परवानगी द्या; आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 09:38 PM2020-03-26T21:38:37+5:302020-03-26T21:41:55+5:30

राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध

CoronaVirus Allow 6 medical colleges to test Health Ministers rajesh tope urges centre government | CoronaVirus: राज्यातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीनं चाचणीची परवानगी द्या; आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

CoronaVirus: राज्यातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीनं चाचणीची परवानगी द्या; आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Next

मुंबई : कोरोनाच्या चाचणीसाठी राज्यातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (इंडियन काऊन्सिल आफ मेडिकल रिसर्च) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.

राज्याच्या एकंदरीत परिस्थितीची माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले,  राज्यात कोरोनाला प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. सध्या कोरोना चाचणीसुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील उपलब्ध आहे मात्र या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. ही परवानगी तातडीने द्यावी जेणेकरून धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर याठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्या करता येतील.

राज्यात वैद्यकीय संसाधनेही उपलब्ध
कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन ९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेटीलेटर याची आवश्यक उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपात्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनासामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: CoronaVirus Allow 6 medical colleges to test Health Ministers rajesh tope urges centre government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.