CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 06:22 PM2021-04-20T18:22:35+5:302021-04-20T18:25:57+5:30

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. (Anand Mahindra)

CoronaVirus: Anand Mahindra tell importance about mask in corona wave | CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

googlenewsNext

मुंबई - जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात, जीव वाचविण्यासाठी औषधांबरोबरच मास्कदेखील उपयोगी ठरत आहे. मास्क लावून लोक स्वतःचा कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतात. मात्र, तरीही लोक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अशाच काही बेजबाबदार लोकांना महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून  सल्ला दिला आहे. (CoronaVirus: Anand Mahindra tell importance about mask in corona wave)

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. तर बघूया नेमकं काय ट्विट केलंय आनंद महिंद्रा यांनी...

CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट सोशल मिडियावरून घेतले आहे आणि आपल्या वॉलवर पोस्ट केले आहे. यात लिहिले आहे - यमराजांनी चित्रगुप्त यांना विचारले, ‘आपण पृथ्वीवर गेला होतात, काय झाले?’ त्यांनी उत्तर देताना सांगितले, ‘महाराज, लोकांनी मास्क लावलेले आहे. मी अनेकांना ओळखूच शकलो नाही. त्यामुळे ज्यांना मास्क लावले नव्हते, त्यांना घेऊन आलो आहे.’ या मेसेजचा विचार केल्यास, सध्या खरोखरच, अशी स्थिती बघायला मिळत आहे. खरोखरच, जे लोक मास्क वापरत नाहीत, ते स्वतःला आणि इतरांनाही मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत.

महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेकांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहेत. वेळेचा विचार करता हा अत्यंत योग्य सल्ला आहे, असे लोक म्हणत आहेत. तसेच त्यांचा हा मेसेज शेअरही करत आहेत.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?
 
महिंद्रा यांनी केलेले हे ट्विट आतापर्यंत सहाशेहून अधिक वेळा रीट्विटदेखील करण्यात आले आहे, तर हजारो वेळा लाइकदेखील करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus: Anand Mahindra tell importance about mask in corona wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.