Coronavirus: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह, महाराष्ट्रातील या कंपनीने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 10:06 AM2021-08-11T10:06:16+5:302021-08-11T10:07:49+5:30

Corona Vaccine: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत असल्याचा दावा महाष्ट्रातील एका कंपनीने केला आहे.

Coronavirus: Antibody drug in horses causes RT-PCR test in 72 hours, claims company in Maharashtra | Coronavirus: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह, महाराष्ट्रातील या कंपनीने केला दावा

Coronavirus: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह, महाराष्ट्रातील या कंपनीने केला दावा

Next

मुंबई - कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जगभरात विविध औषधे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत असल्याचा दावा महाष्ट्रातील एका कंपनीने केला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर स्थित चार वर्षे जुन्या एका बायोसायन्स कंपनीकडून कोरोना विषाणूच्या संसर्गावरील उपचारांसाठी एका प्रभावी औषधाची चाचणी सुरू आहे. आता हे औषध सर्व मानदंडांवर प्रभावी ठरले तर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असेलल्या रुग्णांसाठी भारतात विकसित झालेले हे पहिले औषध ठरणार आहे. या औषषाचा वापर हा कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी केला जाणार आहे. (Antibody drug in horses causes RT-PCR test in 72 hours, claims company in Maharashtra) 

या औषधाच्या प्राथमिक परीक्षणामध्ये अपेक्षा वाढवणारे निष्कर्ष समोर आले आहे. या औषधाच्या वापरामुळे ७२ ते ९० तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येत असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या या औषधाच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा सुरू आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही चाचणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयसेरा बायोलॉजिकल ही केवळ चार वर्षे जुनी कंपनी आहे. तसेच आतापर्यंत अँटीसीरम प्रॉडक्टचे उत्पादन करते. या कामामध्ये कंपनीला सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडूनही मदत मिळत असते. यादरम्यान, कंपनीने कोविड अँटीबॉडीजचं एक प्रभावी कॉकटेल तयार केले आहे. तसेच त्याच्या वापरामुळे कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांमधील संसर्गाचा फैलाव रोखता येऊ शकतो. तसेच शरीरात असलेल्या विषाणूंना नष्टही करता येऊ शकते.

आयसीएमआरचे माजी महासंचालक प्रा. एन.के. गांगुली यांनी सांगितले की, आतापर्यंत हे औषध अपेक्षा वाढवत आहे. मात्र आपण मानवी चाचणीच्या अहवालाची वाट पाहिली पाहिजे. जर हे औषध उपयुक्त असल्याचे समोर आले तर ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. विशेषकरून भारतासारख्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय औषधांपेक्षा हे औषध स्वस्त असेल, अशी मला अपेक्षा आहे.

तर आयसेरा बायोलॉजिक्सचे संचालक (न्यू प्रॉडक्ट) नंदकुमार कदम यांनी सांगितले की, औषधाच्या कॉकटेलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कोविड-१९ न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीचा समावेश आहे. या सर्व बाहेरील रसायनांना बाजूला करून शुद्ध करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमधून काढण्यात आलेले खास अँटीजन घोड्यामध्ये इंजेक्ट करून ही अँटीबॉडी विकसित केली गेली आहे. कंपनीला योग्य अँटीजनची निवड करण्यामध्ये सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने मदत केली आहे. तसेच तसेच बाधितामध्ये अँटबॉडी विकसित करणाऱ्या रसायनांची निवड करण्यासाठीही मदत केली आहे. अँटीबॉडी विकसित करण्यासाठी घोड्यांची निवड करण्यात आली होती. कारण मोठे जनावर असल्याने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी विकसित होत असतात.  

Web Title: Coronavirus: Antibody drug in horses causes RT-PCR test in 72 hours, claims company in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.