Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क टाळणे हाच उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:00 PM2020-03-21T22:00:00+5:302020-03-21T22:00:07+5:30

समूहाने एकत्र येणे टाळण्यातच हित

Coronavirus : Avoid public contact for Corona's solution | Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क टाळणे हाच उपाय

Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क टाळणे हाच उपाय

Next
ठळक मुद्देकोरोनाची प्रसारसाखळी तोडावी 

पुणे : जगभरातील १७७हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला. देशातील २२ राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण कोरियासारखे आपण प्रत्येक जण कोरोना चाचणी का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतासारख्या १३५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिक विविधता असलेल्या देशामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण बंद हाच पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 
दक्षिण कोरियामध्ये एका महिलेने कोरोना चाचणी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुढे त्या महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, तिच्यामुळे तब्बल १६० नागरिकांना बाधा झाल्याचेदेखील उघड झाले. भारतामधील बहुतांश प्रकरणांमधे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यामुळेच कोरोनाची बाधा झाल्याचे रुग्ण अधिक आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात केरळ आणि दिल्लीमधून आलेले रुग्ण परदेशातून आलेलेच होते. जयपूरमधे इटलीतून आलेल्या पर्यटकामुळे १७ जणांना बाधा झाली. 
आगºयामधील काही प्रकरणांमधे रुग्ण परदेशी गेले नव्हते. तसेच, त्यांचा बाधित व्यक्तींशी थेट संबंधदेखील आला नव्हता. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आग्रा येथे २ जण इटलीहून आले होते. त्यांच्यामुळे परिवार बाधित झाला. महाराष्ट्रातील बहुतांश प्रकरणामध्ये परदेशवारी करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आल्यानेच बाधा झाल्याची संख्या अधिक आहे. देशामध्ये महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि लडाखमध्ये रुग्णांची संख्या दुहेरी आहे. 
जगामधे सर्वाधिक ८० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या चीनमधे असून, खालोखाल इटलीमधे ४८ हजार रुग्ण आहेत. स्पेन, जर्मनी, अमेरिका, इराण या देशांमधे वीस हजारांहून अधिक रुग्ण आहेत. फ्रान्स आणि दक्षिण कोरियामधे रुग्णांची संख्या दहा ते बारा हजार आहे. भारतातील रुग्णांची संख्यादेखील पावणेतीनशेच्या वर गेली आहे. त्यात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत आहे. 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार दक्षिण कोरियाने लाखो लोकांची चाचणी केली. तसेच, प्रत्येक रुग्णाची माहिती ठेवली जात आहे. सर्वाधिक उद्रेक झालेल्या चीन, इटली या देशांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनसंपर्क तोडण्यावरच भर दिला. चीनमधील हुबेई हा प्रांत तब्बल ५० दिवस बंद होता. सर्व नागरिकांना स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. अमेरिकेने देखील तेच पाऊल उचलले असून, सर्व कार्यालये बंद केली आहेत. त्यामुळे जनसंपर्क टाळणे हेच त्यावरील प्रभावी अस्त्र आहे. 
000

Web Title: Coronavirus : Avoid public contact for Corona's solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.