CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 01:35 PM2021-05-01T13:35:26+5:302021-05-01T13:42:58+5:30

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

CoronaVirus: Bharat Ratna Lata Mangeshkar donates Rs 7 lakh for covid 19 Special Chief Minister's Assistance Fund | CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

Next
ठळक मुद्देजास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. 

मुंबई : कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोविड १९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. 

(CoronaVirus News: दिलासा! मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट; राज्यात रुग्णवाढीचा आलेख चढाच)

दरम्यान, राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी नव्या बाधितांची संख्या मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. रोजच्या नव्या बाधितांचे प्रमाण ६० हजारांच्या घरात आहे.  काल दिवसभरात ६२ हजार ९१९ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांची संख्या ८२८ इतकी आहे. दुसरीकडे,  मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक म्हणजे ६३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; परंतु एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे...
इंग्रजीत-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

Web Title: CoronaVirus: Bharat Ratna Lata Mangeshkar donates Rs 7 lakh for covid 19 Special Chief Minister's Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.