CoronaVirus News: "पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानांची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी?"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:55 AM2020-05-15T08:55:24+5:302020-05-15T10:05:17+5:30
CoronaVirus News: भाजपा पदाधिकाऱ्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं कर्जाने ताब्यात घ्यावं, असा पर्याय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला. त्यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चव्हाणांचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण आणि काँग्रेसवर शरसंधान साधत सरकारला देवस्थानांचं सोनं ताब्यात घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. 'पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानं खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही? एवढीच जर तुम्हाला सरकारची काळजी आहे, तर तुम्ही ज्यांची हुजरेगिरी करता त्या तुमच्या नेत्यांना सांगा. सोनिया गांधींना सांगा त्यांची संपत्ती सरकारला द्यायला. त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रांना सांगा. पी. चिदंबरमला सांगा. सुरेश कलमाडीला सांगा. सामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांनी घरात पुरुन ठेवला, त्यातला रुपया देण्याची त्यांची नियत नाही आणि लोकांनी श्रद्धेनं देवस्थानांना, मंदिरांना दान दिलेली संपत्ती तुम्ही ताब्यात घ्यायला सांगता? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही,' अशा शब्दांत भोसले माजी मुख्यमंत्र्यांवर बरसले.
कोरोनाचा सामना करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा, त्याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असंदेखील भोसलेंनी म्हटलं आहे. 'या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी सक्षम आहेत. त्यांनी २० लाख कोटींचं पॅकेज देशासाठी जाहीर केलंय आणि कमी पडलं तर अजूनही ते जाहीर करतील आणि तो पैसा कसा आणायचा यासाठीही ते सक्षम असतील. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. कारण तुम्हाला तुमच्या पक्षातही कुठलंही स्थान उरलेलं नाही आणि सरकारमध्येही कुठलंही स्थान उरलेलं नाही, म्हणून तुम्ही अशी विधान करत आहात. पण एक गोष्टी कान उघडून ऐका. या आमच्या देवस्थानांना मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं. पण आता आमच्या देवस्थानांना लुटण्याची नियत तुमच्यासारख्या नेत्यांची आणि काँग्रेस पक्षाची असेल, तर हे कदापि शक्य होणार नाही. हा देश आदरणीय पंतप्रधानांच्या हातात अतिशय सुरक्षित आहे,' असं भोसले म्हणाले. चव्हाण यांनी त्यांचं विधान ताबडतोड मागे घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?
केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जानं ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्याअंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोने १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.
गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील षडयंत्राविरोधात उतरला भारत; पाकला दिला कडक इशारा
..तर तीन महिने पगार न मिळालेल्या ‘त्या’ 11 कोटी लोकांना कोणता लाभ होणार?
‘स्वावलंबी भारत’चा दुसरा टप्पा :शेतकरी, मजुरांसाठी ३.१६ लाख कोटी
कमी आयात आणि जास्त निर्यात हाच देशाच्या समृद्धीचा मार्ग!, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा