भाजपा आमदाराने बीडच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:58 PM2020-05-19T15:58:11+5:302020-05-19T16:01:27+5:30

बीड जिल्ह्यामध्ये १२ रुग्ण सापडले आहेत. शहरात यापैकी काही असल्याने काही भाग कन्टेन्मेंट घोषित करण्यात आला आहे.

CoronaVirus BJP MLA Suresh Dhas enters Beed's containment zone; Register Fir hrb | भाजपा आमदाराने बीडच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला; गुन्हा दाखल

भाजपा आमदाराने बीडच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला; गुन्हा दाखल

googlenewsNext

बीड : झोन निश्चित करण्याची जबाबदारी राज्य सरकारांकडे देण्यात आली आहे. यानुसार राज्ये त्यांच्या जिल्ह्यातील झोन निश्चित करणार आहेत. बीडमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे बीड शहरामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. आज भाजपाच्या आमदाराला या झोनमध्ये प्रवेश केल्याचे भोवले आहे. 


बीड जिल्ह्यामध्ये १२ रुग्ण सापडले आहेत. शहरात यापैकी काही असल्याने काही भाग कन्टेन्मेंट घोषित करण्यात आला आहे. मात्र, आधीच भीतीचे वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमध्ये बंदी घातली आहे. मात्र, आमदार सुरेश धस यांनी यामध्ये येत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यामुळे त्यांनी संचारबंदीचे आदेश मोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी मधील पाटण सांगवी या कंटेन्मेंट झोन परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात सुरेश धस यांनी प्रवेश केला होता. यापूर्वी देखील ऊसतोड कामगारांना सोडवण्यासाठी जिल्हा बंदी डावलून गेल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट

मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

 

Web Title: CoronaVirus BJP MLA Suresh Dhas enters Beed's containment zone; Register Fir hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.