CoronaVirus: नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकरांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 05:32 PM2021-05-11T17:32:47+5:302021-05-11T17:36:15+5:30
CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील, असे दरेकर यांनी म्हटले आहे. (coronavirus bjp pravin darekar replied nawab malik on corona situation)
गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!
नवाब मलिक यांचे केवळ राजकारणाकडे लक्ष
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात नवाब मलिक यांनी उपाययोजना सुचवल्याचे कधी ऐकीवात नाही. उपलब्ध व्यवस्था गतिमान कशा होतील, याबाबत सूचना केल्याचे त्यांच्या प्रेममध्ये सांगितल्याचे मला आठवत नाही. केंद्राला टार्गेट करत केवळ आपल्या सोयीची दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत राजकारण करण्याचा प्रयत्न नवाब मलिक करताना दिसतायत, अशा शब्दांत दरेकरांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील.@BJP4Maharashtrapic.twitter.com/207HtQT4a2
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 11, 2021
दुसऱ्या राज्यांच्या चांगल्या गोष्टीही घ्याव्यात
दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत असताना, त्या राज्यांनी कोरोनाच्या काय चांगल्या उपाययोजना, चांगल्या गोष्टी केल्या, त्या आपल्याकडे अमल करण्यासाठी राज्य सरकारने काय केले, याचे उत्तर नवाब मलिक देऊ शकत नाहीत, अशी टीका करत केंद्र आणि राज्य असा वाद आताच्या घडीला बंद होण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
“ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका
सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत परदेशातून आलेल्या मदतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. एक गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. आपण परदेशांना मदत केली नसती, तर आपल्याला मदत करण्याची भूमिका त्या देशांनी घेतली नसती. संकटाच्या काळात संकुचित विचार करणे योग्य नाही. व्यापकदृष्टिने विचार होण्याची गरज आहे. सुसंवादातून, चांगल्या समन्वयातून सर्वांनी एकत्रितपणे या संकटाला सामोरे जायला हवे. अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो, असे दरेकर यांनी सांगितले.