Coronavirus : दोडामार्ग येथील नागरिकांनी 'सोशल डिस्टन्सिंग' पाळून केली भाजी खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:55 PM2020-03-29T23:55:58+5:302020-03-29T23:56:25+5:30
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पांढऱ्या रंगाने दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतरावर चौकोन आखले आहेत.
दोडामार्ग : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असली, तरी नागरिकांची गरज लक्षात घेऊन कसई-दोडामार्ग नगरपंचायतीतर्फे अत्यावश्यक सुविधा रविवारपासून उपलब्ध करण्यात आल्या. येथील नागरिकांनी 'सोशल डिस्टन्सिंग' पाळून भाजी खरेदी केली.
उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण मित्रमंडळाने पुढाकार घेत दोडामार्ग येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात भाजीचे स्टॉल लावले आहेत. चव्हाण यांच्या मार्गदर्शननाखाली शिस्तबद्धपणे नागरिकांनी खरेदी केली. परिसरातील भाजी विक्रेत्यांना एकत्र करून सध्या दोन स्टॉल लावले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पांढऱ्या रंगाने दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतरावर चौकोन आखले आहेत. गर्दीवर नियंत्रणासाठी चव्हाण यांच्या मित्रमंडळातर्फे स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून त्यांना नगरपंचायतीकडून ओळखपत्रे दिली आहेत. या ठिकाणी दोडामार्ग पोलीस स्टेशनकडूनही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.