coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:01 PM2020-04-24T23:01:08+5:302020-04-24T23:02:06+5:30

सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना राजस्थान सरकारचा सकरात्मक प्रतिसाद

coronavirus: clear way for students to return home who stay in kota, Rajasthan | coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा?

coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा?

googlenewsNext

मुंबई  - लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्यजीत तांबे याना पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारसोबत या विषयावर चर्चा होत असून लवकरच निर्णय निघेल अशी आश्वासन दिले आहे, 

सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राजयचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे , सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली. 

राजस्थान कोटा येथे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले जवळपास 1500-2000 विद्यार्थी लॉकडाऊन मुळे अडचणीत अडकले असून,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने पुढाकार घेत महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परतायची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सत्यजीत तांबे यांना ट्विट करून दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती दिली.

सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे , सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली.

Web Title: coronavirus: clear way for students to return home who stay in kota, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.