CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंकडून फडणवीस, राणेंचा अप्रत्यक्षपणे 'विशेष' उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 09:39 PM2020-05-31T21:39:33+5:302020-05-31T21:43:38+5:30

CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांकडून मिशन बिगिन अगेनची घोषणा

CoronaVirus CM uddhav thackeray indirectly mentions devendra fadnavis narayan rane kkg | CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंकडून फडणवीस, राणेंचा अप्रत्यक्षपणे 'विशेष' उल्लेख

CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंकडून फडणवीस, राणेंचा अप्रत्यक्षपणे 'विशेष' उल्लेख

Next

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येणार असून आता लॉकडाऊन हा शब्दच केराच्या टोपलीत टाकायचा आहे असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आता मिशन बिगिन अगेन सुरू होत असल्याची घोषणा ठाकरेंनी केली. आता आपल्याला हळूहळू पुढे जायचंय. एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये जनतेची साथ आवश्यक असल्याचं ठाकरे म्हणाले. आता सुरू केलेल्या सुविधा, सेवा पुन्हा बंद करायला लावू नका, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या टिपेला पोहोचली आहे. मात्र आपण बंधन पाळली तर ही संख्या कमी होईल. सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाच्या ६५ हजार केसेस आहेत. मात्र यातले २८ हजारच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. मात्र तरीही त्यांना ६५ हजारमध्ये धरलं जातं. सध्या उपचार घेत असलेल्यांपैकी १२०० जणांची प्रकृती गंभीर आहे. तर २०० जण व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र याआधी व्हेंटिलेटर असलेले अनेक जण घरीदेखील परतले आहेत, अशी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. 

भाजपाच्या काही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि मुंबई लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. विरोधकांच्या या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'काही आपलीच माणसं राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा दु:ख होतं,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाला रोखण्यासाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचीदेखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. 'पावसाळ्यात आजारांचं प्रमाण वाढतं. ते पाहता चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर कमी करण्यासाठी केंद्रासोबत चर्चा सुरू आहे. लॅबची संख्या वाढवली जात आहे. जास्तीत जास्त जणांना ऑक्सिजन बेड्स लागतात. ती सोय आपण करत आहोत. गेल्या दोन महिन्यात उपचार, सुविधांवर आपण विशेष लक्ष दिलं आहे. आपला टास्क फोर्स अविश्रांत मेहनत करत आहे. मृत्यूदर खाली आणण्यात यश आलं आहे. तो आणखी खाली आणायचा आहे. काही रुग्ण शेवटच्या टप्प्यात दाखल होतात. त्यामुळे दुखणं अंगावर काढू नका. वेळेत या, उपचार घ्या आणि बरे व्हा,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

Video: पुनश्च हरी ओम... लॉकडाऊनचा कालावधी संपून पूर्वपदावर येण्यास सुरुवात

विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा

Web Title: CoronaVirus CM uddhav thackeray indirectly mentions devendra fadnavis narayan rane kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.