Coronavirus: दिलासादायक! आतापर्यंत १९ लाख १२ हजार कोरोनामुक्त; राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.१८%
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:11 AM2021-01-25T02:11:39+5:302021-01-25T02:11:52+5:30
राज्यात रविवारी २,७५२ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ४५ मृत्यूंची नोंद झाली
मुंबई : राज्यात रविवारी काेराेनाचे १,७४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण १९ लाख १२ हजार २६४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्के एवढे झाले आहे. सध्या ४४,८३१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्युदर २.५३ टक्के एवढा आहे.
राज्यात रविवारी २,७५२ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ४५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० लाख ०९ हजार १०६ एवढी झाली असून बळींचा आकडा ५० हजार ७८५ एवढा आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४५ मृत्यूंमध्ये मुंबई ७, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, मीरा-भाईंदर मनपा १, नाशिक १, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा १, पुणे १, पिंपरी चिंचवड मनपा १, सातारा ४, कोल्हापूर १, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ३, परभणी १, उस्मानाबाद १, बीड २,अमरावती मनपा १, वाशिम १, नागपूर ४, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,०७,५९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०९,१०६ (१४.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,९९३ व्यक्ती होमक्वारंटाइन, तरर २,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.