CoronaVirus: जिल्हानिहाय व संस्थानिहाय होणार कोरोना निदान; जाणून घ्या आपल्याजवळचं टेस्टिंग सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:16 PM2020-04-06T16:16:44+5:302020-04-06T16:17:20+5:30

राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे.

CoronaVirus: Corona diagnosis will be district-wise and institution-wise; Know the Testing Center near you vrd | CoronaVirus: जिल्हानिहाय व संस्थानिहाय होणार कोरोना निदान; जाणून घ्या आपल्याजवळचं टेस्टिंग सेंटर

CoronaVirus: जिल्हानिहाय व संस्थानिहाय होणार कोरोना निदान; जाणून घ्या आपल्याजवळचं टेस्टिंग सेंटर

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कोरोनाच्या चाचणीसाठीच्या प्रयोगशाळांतही वाढ करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे.
ही यादी पुढीलप्रमाणे -
 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता - प्रयोगशाळा-  कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.
 2. ठाणे जिल्ह्याकरिता - रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
 3. पालघर जिल्ह्याकरिता -  उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
 4.  सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
 5. पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
 6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व  नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
 7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली
 8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद -  या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
 9. धुळे, जळगाव, नंदुरबार,  नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका)  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा -   
   श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
 10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  बीड  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
 11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
 12.  नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

Web Title: CoronaVirus: Corona diagnosis will be district-wise and institution-wise; Know the Testing Center near you vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.