CoronaVirus एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:53 PM2020-07-07T19:53:15+5:302020-07-07T20:04:51+5:30
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला होता. याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली होती. यानंतर त्यांच्या घरातील ८ सदस्यांनाही कोरोना झाला होता.
मुंबई : एकीकडे भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या लढ्याच्या तयारीच्या पाहणीसाठी राज्यभर फिरत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार कोरोना बाधित होत आहेत. आज दिवसभरात तीन भाजपाच्या आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. धक्क्दायक म्हणजे यापैकी दोन आमदार हे पुण्यातील आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला होता. याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली होती. यानंतर त्यांच्या घरातील ८ सदस्यांनाही कोरोना झाला होता. आता पुण्याच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना झाला आहे. टिळक यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
तर भाजपचेच पुणे जिल्ह्यातील दौ़डचे आमदार राहुल कुल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. यामुळे पुण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कोरोनाने विळखा घातला असून महापालिकेचे अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत.
पुण्यानंतर उल्हासनगरमध्ये भाजपाचे तिसरे आमदार कोरोना बाधित झाले आहेत. कुमार आयलानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सत्ताधारी पक्षांतील दोन मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ते उपचारानंतर बरे झाले होते. आता विरोधी पक्षातल्या आमदारांना कोरोनाने गाठले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता राज्यातील हॉटस्पॉट असलेल्या भागांचा दौरा करणार आहेत. गेले आठवडाभर ते ठाणे, पुणे, सोलापूर आदी भागाच्या दौऱ्यावर होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर
CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला
चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत