coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

By यदू जोशी | Published: May 16, 2020 06:24 AM2020-05-16T06:24:52+5:302020-05-16T06:24:57+5:30

कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे.

coronavirus: Cotton worth Rs 2,250 crore falls on farmers' houses, lockdown hits' marketing ' | coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

coronavirus: सव्वादोन हजार कोटींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, लॉकडाउनचा ‘पणन’ला मोठा फटका

googlenewsNext

- यदु जोशी
मुंबई : प्लॉकडाऊनच्या काळात जवळपास दीड महिना कापसाची खरेदी बंद असल्याने सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांचा ५० लाख क्विंटलहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आजही पडून आहे.
कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे. कापसाची आवक होणाºया वाहनांची संख्या व अशा केंद्रांवर काम करणाºया कामगारांच्या संख्येवर संबंधित जिल्हाधिकाºयांनी निर्बंध आणले असल्यामुळे कापूस खरेदीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी खरेदी पूर्ण होणे आवश्यक आहे.
पणन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे शेतमाल मोठ्या बाजार समित्यांमध्ये पाठविता आला नाही.
३०६ बाजार समित्यांपैकी सुमारे २६० ते २७० बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे व्यवहार सुरू असले तरी त्याची गती अतिशय धीमी आहे. मुंबई, पुण्यासारख्या बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग, पॅकिंगचे काम प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारी कामगार करतात. रावेरच्या केळी बाजारात परप्रांतीय, विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांवर तेलंगणातील तर नाशिकच्या कांदा मार्केटमध्ये पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात. अनेक जण मूळ गावी गेल्याने या बाजारांना फटका बसला आहे.
खासगी बाजार, एकल परवानाधारक व थेट खरेदी परवानाधारकांनी कामगाराअभावी खरेदी बंद ठेवली. ई नाम व्यवस्थेलाही कोरोनाचा फटका बसला.
आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे एप्रिल २०१९ मधील २.४५ लाख मे. टन निर्यातीच्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये २.३० लाख मे. टन झाली आहे.

व्यवस्था पूर्ववदावर आणण्याचे प्रयत्न
शेतकरी आणि ग्राहकांना जोडणारी अत्यंत परिणामकारक अशी पणन व्यवस्था राज्यात पूर्वीपासून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती कोलमडली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
- बाळासाहेब पाटील,
मंत्री, पणन विभाग

असे होत आहे नुकसान

लॉकडाऊनपासून सर्व बाजार समित्यामधील जनावरांचा बाजार बंद आहे. पुरेशा प्रमाणात शेतमजूर / काढणीयंत्र चालवणारे वाहनचालक उपलब्ध नसल्याने काही प्रमुख शेतमालाच्या काढणीवर परिणाम झाला.

शेतमाल बाजार आवारात पोहोचल्यानंतर तेथे मालाची हाताळणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कामगार वर्ग उपलब्ध नसल्याने नाशवंत शेतमाल काढण्याच्या प्रक्रियेस विलंब

बाजार आवारात शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे हमाल, मापारी या घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट वसतिगृहातील कँटीन, इतर धार्मिक सामाजिक, कौटुंबिक समारंभ बंद असल्यामुळे शेतमालाची मागणी कमी झाली आहे.

Web Title: coronavirus: Cotton worth Rs 2,250 crore falls on farmers' houses, lockdown hits' marketing '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.