CoronaVirus News: विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 06:17 AM2020-06-18T06:17:38+5:302020-06-18T06:49:13+5:30
'मिशन बिगीन अगेन'साठी महाराष्ट्राने उचललेल्या पावलांची माहिती मुख्यमंत्र्यांनी सादरीकरणाद्वारे मोदींना दिली.
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत संपूर्ण देशासाठी एकच धोरण असावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. कोरोनाचा मुकाबला करताना 'मिशन बिगीन अगेन'साठी महाराष्ट्राने उचललेल्या पावलांबाबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी सांगितले की, लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नाही. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुणनिश्चितीचा फॉम्युर्ला तयार करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी मिळेल. केंद्राने व्यावसायिक व अव्यावसायिक परीक्षांबाबत केंद्रीय शैक्षणिक संस्थांमार्फत समान निर्णय घेतल्यास सर्व राज्यांतील विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल.
मुख्यमंत्र्यांच्या मागण्या
ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्स द्या.
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता द्या .
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने मुदतवाढ द्या.