CoronaVirus चिंताजनक! राज्यात दिवसभरात मृतांचा आकडा पन्नाशी पार; ३९९ रुग्ण बरे झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:54 PM2020-05-10T21:54:48+5:302020-05-10T21:57:11+5:30
मुंबईमध्ये आज नव्या रुग्णांची संख्या कालपेक्षा दीडशेने वाढली आहे. तर दिवसभरात १९ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंचा हा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे.
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत असून मृत्यूचा आकडाही मुंबईतच जास्त आहे. त्यातच शनिवारी राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २०००० पार गेला होता. आजची आकडेवारी चिंतेत भर घालणारी आहे.
मुंबईमध्ये आज नव्या रुग्णांची संख्या कालपेक्षा दीडशेने वाढली आहे. तर दिवसभरात १९ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंचा हा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे. आज मुंबईत ८७५ नवे रुग्ण सापडले असून ६२५ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर राज्यात आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज ३९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ४१९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मात्र, मृतांच्या आकड्याने पन्नाशी पार केली आहे. हा आकडा आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. आज राज्यात ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णसंख्या २२,१७१ वर गेली असून एकूण बळींची संख्या ८३२ झाली आहे.
1,278 new #COVID19 cases & 53 deaths reported in the state today. The total number of positive cases in the state rises to 22,171: Maharashtra Health Department pic.twitter.com/GrbJt85349
— ANI (@ANI) May 10, 2020
आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५ , जळगाव शहरात ५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार
CoronaVirus लॉकडाऊन संपेना! वैतागून हजारो कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे परराज्यात रवाना
काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार
लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर
एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा