Coronavirus: नियोकोवला घाबरू नका : टास्क फोर्सचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:46 PM2022-01-31T12:46:21+5:302022-01-31T12:47:37+5:30

Coronavirus: आता मुंबईतही नियोकोव या नवीन विषाणूबाबत मंथन सुरू झाले आहे. टास्क फोर्सने मुंबईकरांना वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबाबत काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.

Coronavirus: Don't be afraid of Neocov: Task Force appeal | Coronavirus: नियोकोवला घाबरू नका : टास्क फोर्सचे आवाहन

Coronavirus: नियोकोवला घाबरू नका : टास्क फोर्सचे आवाहन

Next

मुंबई : आता मुंबईतही नियोकोव या नवीन विषाणूबाबत मंथन सुरू झाले आहे. टास्क फोर्सने मुंबईकरांना वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबाबत काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रत्येकाने आपले लक्ष कोविडवर केंद्रित केले पाहिजे आणि नियोकोवबद्दल काळजी करू नये. 
नियोकोव हा व्हेरियंट कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत या विषाणूचा मानवी शरीरावर परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. चीनमधील संशोधकांना नियोकोव या नवीन विषाणूचा शोध लागला आहे. संशोधकांच्या मते हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळला आहे. हा विषाणू फक्त प्राण्यांमध्ये पसरला होता. संशोधकांच्या मते, विषाणू मानवी पेशींमध्ये घुसण्यासाठी फक्त एक उत्परिवर्तन आवश्यक आहे. 
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले , सद्यस्थितीत विषाणूच्या उत्पत्तीबाबत परिस्थिती स्पष्ट नाही. हा विषाणू मानवी शरीरात असल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडला नाही.

Web Title: Coronavirus: Don't be afraid of Neocov: Task Force appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.