Coronavirus: "दारूची दुकाने सुरू करू नका; लोकांच्या जीवापेक्षा महसूल महत्त्वाचा आहे का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:33 AM2020-05-08T04:33:22+5:302020-05-08T07:07:08+5:30
कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य पाहता, दारुचा जीवनावश्यक बाबीत समावेश होत नाही.
अहमदनगर : दारुची दुकाने सुरू करून सरकारला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की दारु विक्रीपासून मिळणारा महसूल? दारुच्या दुकानांमुळे पोलिसांवरील ताण वाढणार असून कोरोनाचा अधिक फैलाव होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक घरात दारूवरून कलह निर्माण होऊ शकतील. दारूची दुकाने सुरू करण्याचा सरकारचा निर्णय अविचारी आहे. याला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असे म्हणता येईल, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले़
कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य पाहता, दारुचा जीवनावश्यक बाबीत समावेश होत नाही. तरीही दारुची दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर गर्दी झाली. गेला महिना-दीड महिना दारू विक्री बंद होती. मग दारू न पिल्यामुळे कोणते नुकसान झाले?, असा प्रश्न हजारे यांनी केला आहे़