CoronaVirus: मशिनवर ठसे उमटले नाही तरी, धान्य द्यायला हवे- पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:42 AM2020-04-25T05:42:46+5:302020-04-25T05:44:32+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
मुंबई : स्वस्त धान्य देताना लाभार्थ्यांना पॉस मशीनवर बोटाचे ठसे उमटले नाही तरी त्यांना धान्य देण्याची सोय करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शासनाने ३१ मार्च व १७ एप्रिल रोजी पॉस मशीनचा वापर न करता देखील धान्य द्या, असे आदेश काढले आहेत. मात्र त्याची माहिती रेशन दुकानदारांना व ग्राहकांना नाही. त्यासाठी या निर्णयांची विविध माध्यमातून जाहिरात देखील करावी. तसेच बाहेरच्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील मजुरांकडे शिधापत्रिका नसल्यास त्यांना अंत्योदय योजनेप्रमाणे तीन महिने धान्य द्यावे. बाधकाम मजुरांना आधार कार्डवर दोन हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे. परदेशात अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.