coronavirus: जालन्यासह महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्यांतील शेतकरी थेट बांधावरून विकणार शेतीमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:29 AM2020-05-13T06:29:04+5:302020-05-13T06:29:35+5:30
पुणे,नाशिक, सोलापूर, साताऱ्याचा समावेश; देशाच्या अन्य भागातही योजना राबविणार
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री आणि उभी पिके कशी वाचवावी, या सामोरे जावे लागत असल्याची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सामान्य सेवा केंद्राच्या माध्यामातून (कॉमन सर्व्हिस सेंटर) योजना आणली आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटरमाध्यमातून शेतीमाल शेतकºयांच्या घरातूनच किंवा थेट शेतीच्या बांधावरुन संबधितांना खरेदीदारांना विकणार आहे. यामुळे शेतकºयांना घरी किंवा शेताच्या बांधावरच खरेदीदारांकडून रोख पैसे मिळतील. या पथदर्शक योजनेसाठी महाराष्टÑातील जालना, नाशिक, पुणे, सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सीएससीने विविध वितरण कंपन्यांना आपल्या आॅनलाईन प्लॅटफार्मशी जोडले असून त्यांच्याशी करारही करण्यात आला आहे. याच योजनेच्या माध्यमातून साताºयातील एका शेतकºयानी १० टन टमाटे विकले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद या योजनेची लवकरच सुरुवात करणार आहेत. महाराष्टÑातील उपरोक्त पाच जिल्ह्यातील पथदर्शक योजना देशाच्या अन्य भागात राबविली जाईल. यासाठी सीएसी नाममात्र सेवा शुल्क आकारेल.
शेतमाल विक्रीची नेमकी काय आहे योजना?
या योजनतहत उपरोक्त जिल्ह्यातील शेतकºयांना सीएससीच्या आॅनलाईन स्थळांशी जोडले जाईल. या ठिकाणी त्यांच्या शेतमालाची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.सोबत विक्रीचा भावही नमूद केले जातील. त्यानंतर ही सर्व माहिती देशभरातील खरेदीदरांना उपलब्ध करुन दिली जाईल.
च्खरेदीदार आणि शेतकºयांशी व्यवहाराबाबत बोलण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे दोघांनाही सौदा करता येईल. त्यानुसार खरेदीदार शेतकºयांच्या घरी वा शेतीवर जाऊन शेतीमाल उचलतील आणि तेथेच शेतकºयांना ठरल्या सौद्यानुसार जागीच पैसे चुकते करतील.