CoronaVirus चिंता वाढली! सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा रूग्ण आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:54 PM2020-05-11T22:54:19+5:302020-05-11T22:55:33+5:30

कालच दुसऱ्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. ही तरुणी मुंबईहून तिच्या कुटुंबीयांसोबत आली होती.

CoronaVirus fifth patient of corona was found in Sindhudurg district hrb | CoronaVirus चिंता वाढली! सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा रूग्ण आढळला

CoronaVirus चिंता वाढली! सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा रूग्ण आढळला

Next

सिंधुदुर्गनगरी : एकीकडे रत्नागिरीमध्ये मुंबईहून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असताना आता सिंधुदूर्ग जिल्ह्यालाही धोका निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.


कालच दुसऱ्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. ही तरुणी मुंबईहून तिच्या कुटुंबीयांसोबत आली होती. यानंतर एका आंब्याच्या ट्रक चालकाला कोरोना झाला होता. आज देवगड तालुक्यातील ५१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच झाली असून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


देवगड तालुक्यातील या महिलेचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह असल्याचे समजले. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.  सदर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनला भरली धडकी! रहस्यमयी महिलेमुळे नवे शहर लॉकडाऊन करण्याची वेळ

CoronaVirus मुंबईत नव्या रुग्णांचे प्रमाण घटले निदान; आज २० मृत्यूंची नोंद

CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

Web Title: CoronaVirus fifth patient of corona was found in Sindhudurg district hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.