Coronavirus: कोरोनाची ग्रामीण भागातही धडक; नगरमध्ये एक रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:21 PM2020-03-13T22:21:34+5:302020-03-13T22:32:25+5:30

राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर पोहोचली

Coronavirus first patient found in ahmednagar takes state patient count to 18 | Coronavirus: कोरोनाची ग्रामीण भागातही धडक; नगरमध्ये एक रुग्ण सापडला

Coronavirus: कोरोनाची ग्रामीण भागातही धडक; नगरमध्ये एक रुग्ण सापडला

Next
ठळक मुद्देशहरी भागांपाठोपाठ कोरोनाची ग्रामीण भागात धडकअहमदनगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलाराज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर

अहमदनगर: शहरी भागांपाठोपाठ कोरोनानं ग्रामीण भागात धडक दिली आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी ४० जणांचा एक गट दुबईहून परतला होता. त्यात नगरमधल्या एका व्यक्तीचा समावेश होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

देशातल्या ४० जणांचा एक गट मध्यंतरी दुबईला गेला होता. काही दिवसांपूर्वीच हा गट मायदेशी परतला. या गटातल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातल्या एकाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नगरमधल्या कोरोना रुग्णाची प्रकृती स्थिर असून अद्याप सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आढळून आलेली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. 

नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे. कोरोनाची बाधा झालेले सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात १० जणांवर उपचार सुरू आहेत. नागपूर, मुंबई कोरोनाचे प्रत्येकी ३ रुग्ण आढळले असून ठाण्यात एक रुग्ण सापडला आहे. 
 

Web Title: Coronavirus first patient found in ahmednagar takes state patient count to 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.