Coronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:48 PM2020-05-28T13:48:55+5:302020-05-28T13:51:13+5:30
राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १९० हून अधिक देशांसमोर संकट उभं राहिलं आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात ५५ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १८०० हून जास्त मृत्यू झाले आहेत.
राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.
अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला प्रशासकीय अधिकारी भेट देत असतात, मंत्र्यांसोबत त्यांचे पाहणी दौरे, बैठका सुरु असतात, त्यामुळे त्यांनाही कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. कोरोनाची लागण झालेल्या या ५ अधिकाऱ्यांपैकी २ दाम्पत्य आहेत. एक निवृत्त आयएएस अधिकारी ज्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, त्याशिवाय एक आयएएस अधिकारी आणि त्याची पत्नी, एक आएएस महिला अधिकारी आणि त्यांचे आयपीएस पती , यांना कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे मुंबईतल्या विविध खाजगी इस्पितळांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यामुळे अधिकारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
राज्यात आतापर्यंत २ हजाराहून जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८९७ पोलिसांवर यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. मुंबईत १ हजार ५२ पोलीस कोरोनाग्रस्त आढळले आहेत. बुधवारी अवघ्या २४ तासात १३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संकट काळात आपली जीव धोक्यात घालून पोलीस, डॉक्टर्स, अधिकारी लोकांच्या सेवेसाठी काम करत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश
तणाव वाढला! भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा
छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…
भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण
आरोग्य सेतू अॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!