Coronavirus: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण; पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 12:55 AM2020-07-04T00:55:21+5:302020-07-04T06:55:34+5:30
कर्जतच्या माजी आमदारांना कोरोना, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
कर्जत : कर्जत बोरवाडी येथील उत्तरकार्यामध्ये सहभागी झालेल्या माजी आमदार सुरेश लाड यांची त्यांच्या अन्य नातेवाइकांच्यासह कोरोना टेस्ट करण्यात आली होती.
२९ जून रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती माजी आमदार सुरेश लाड यांनी एक प्रसिद्धीपत्रक सोशल मीडियावर जाहीर केले. त्यात आपण स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असून, पुढील १४ दिवस आपणास कोणी भेटायला येऊ नये. काही तातडीचे काम असल्यास फोनवर मेसेज द्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
माजी आ.सुरेश लाड यांनी प्रसिद्धीपत्रकातआपल्या दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आम्ही पती-पत्नी ठणठणीत आहोेत, असे नमूद केले आहे. किरवली ग्रामपंचायतीमधील बोरवाडी येथील जैतुशेठ बडेकर हे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे सासरे होते. बडेकर यांचे ८ जून रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे उत्तरकार्य १८ जून रोजी होते. त्या उत्तरकार्यात सहभागी त्यांच्या कुटुंबातील एका ६१ वर्षीय महिलेचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या २७ जणांना या महिलेल्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली.
माजी आमदार सुरेश लाड यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. २६ जून रोजी लाड यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आणि २८ जून रोजी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २९ जून रोजी सुरेश लाड यांना कर्जत आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी क्वारंटाईन केले आहे.