coronavirus: शक्य असल्यास सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:09 AM2020-05-11T01:09:30+5:302020-05-11T01:10:40+5:30
सध्या सरकारी रुग्णालयात पहिल्या ५ वर्षांपर्यंतच्या मोफत लसीकरणासाठी जाणे अवघड झाले आहे. एक तर यातील काही शासकीय रुग्णालये ही कोविड हॉस्पिटल्स आहेत. तर ब्ऱ्याच ठिकाणी संशयित तपासले जातात.
सध्या सरकारी रुग्णालयात पहिल्या ५ वर्षांपर्यंतच्या मोफत लसीकरणासाठी जाणे अवघड झाले आहे. एक तर यातील काही शासकीय रुग्णालये ही कोविड हॉस्पिटल्स आहेत. तर ब्ऱ्याच ठिकाणी संशयित तपासले जातात. याशिवाय सरकारी आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहेत. यामुळे नियमित लसीकरण ३ ते ४ महिने शक्यतो खाजगी रुग्णालयात घ्यायला हरकत नाही. ज्या लशी सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात, त्या खासगी रुग्णालयात अत्यंत स्वस्त आहेत.
गोवर, बीसीजी, एमएमआर स्वस्त आहेतच पण पेन्टा म्हणजे ट्रिपल, मेंदूज्वर, कावीळ ही लस ३९५ रुपये एवढ्या किमतीची आहे. याचे दीड, अडीच, साडेतीन व अठरा महिने असे ४ डोस असतात. खासगी प्रॅक्टीस करणाºया बालरोगतज्ज्ञांनी यासाठी पुढील काही महिने तरी केवळ लशीची मूळ किंमतच आकारावी. त्यावर आपले कन्सल्टेशन चार्जेस व इंजेक्शन देण्याचे चार्जेस घेऊ नये. यामुळे सरकारी रुग्णालयातील कामाचा ताण तर कमी होईलच, शिवाय सरकारी रुग्णालयात जाऊन सर्दी , खोकला तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही अंशी कमी होईल. अजून एक मधला मार्ग काढला जाऊ शकतो. सरकारी रुग्णालयात असलेल्या लशींचा स्टॉक सरकारी रूग्णालयाने बालरोगतज्ज्ञांकडे द्यावा. त्या लशी बालरोगतज्ज्ञांनी टोचून द्याव्या. या मोफत लशी खाजगी रुग्णालयात मिळणार आहेत, या जनजागृतीसाठी आशा सेविकांची मदत घेता येईल. यामुळे लसीकरणाचे प्रमाणही वाढेल.
- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)