Coronavirus : महाराष्ट्राचे 'मिशन कोरोना'; राज्यभरातील दिलासादायक पॉझिटिव्ह बातम्या एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:45 PM2020-03-21T15:45:22+5:302020-03-21T15:45:54+5:30
Coronavirus : सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे.
मुंबई - कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावली असून सर्व जिल्ह्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ झाली असून, 52वरून रुग्णांची संख्या आता 63वर पोहोचली आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. राज्यभरातील अनेक लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवांचा पाऊस पडत असताना अचूक माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अॅक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता.
कोरोनाशी लढाः दिलासादायक पॉझिटिव्ह बातम्या
Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना
पुणेः कोरोनाबाधितांच्या एक किमी परिसरातील ४० हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण
हुश्श ..!! उपचार घेत असलेली प्राध्यापिका कोरोना मुक्त; संशयित 22 जणांचे अहवालही निगेटिव्ह
औरंगाबादकरांना मोठा दिलासा; कोरोनाबाधीत प्राध्यापिकेच्या घरातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह
नागपुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारतेय
अहमदनगरः कोरोनाबाधित रूग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह; बाधितांची प्रकृती उत्तम
अकोलाः जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, संशयिताचा अहवाल निगेटिव्ह
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न
अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअप नंबर; चॅटबोट देणार उत्तर
‘ए’ रक्तगटाला कोरोनाचा धोका अधिक, ही निव्वळ अफवाच
बीडकरांना दिलासा; 'दुबई रिटर्न' महिलेचा अहवाल निगेटिव्ह
बुलडाणाः 12 विदेशी नागरिकांची प्रकृती ठणठणीत
कोल्हापूरचा संशोधक शोधतोय कोरोनावर लस
दादरमधील दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहणार; व्यापाऱ्यांचा स्तुत्य निर्णय
पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवरचं रोखणार कोरोना !
मनाचा मोठेपणा; पुण्यात मेस बंद झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य डबे घेऊन अवतरली 'अन्नपूर्णा'