कोरोनाविरोधात लढाई! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:28 IST2020-05-12T18:27:23+5:302020-05-12T18:28:44+5:30
कोरोनामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण जात आहे.

कोरोनाविरोधात लढाई! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शासनाच्या या अडचणीत आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनातून, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंबंधीचे पत्र कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला दिले आहे. यामुळे जवळपास साडेपाच लाख सरकारी कर्मचारी वर्गाचे अंदाजीत ३०० कोटी रुपयांचे सहाय्य शासनाला मिळणार आहे.
आर.जी.कर्णिक प्रणीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्रात गेली ५८ वर्षे कर्मचारी व शासन यांच्यातील दुवा ठरली असुन राज्य शासन व कर्मचारी यांच्यातील दुवा ठरली आहे. राज्य शासन व कर्मचारी यांच्यातील सुसंवाद कायम राखण्याचे महत्वाचे कार्य सतत पार पाडीत असल्याचे सरचिटणीस, विश्वास काटकर, प्रसिद्धी प्रमुख सुरेश सरतापे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार
चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले
गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका