coronavirus: ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकारने घेतली, खरिपाचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 06:19 AM2020-05-16T06:19:06+5:302020-05-16T06:19:54+5:30
लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ८,१०० कोटी देणे बाकी आहे.
मुंबई : राज्यातील अकरा लाख शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व शेतकºयांना बँकांनी कर्ज द्यावे, असा आदेश सरकार काढत असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ८,१०० कोटी देणे बाकी आहे. सरकारतर्फे एक आदेश काढण्यात येत आहे. या ११ लाख शेतकºयांकडून येणारी थकबाकी आता शासनाकडून येणे आहे अशी नोंद शेतकºयांच्या कर्ज खात्यावर करण्याविषयीचे आदेश राज्यातल्या सर्व बँकांना पाठवले जात आहेत. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांसोबत याबद्दल एक बैठक झाली.
आरबीआयने देखील ही अडचण लक्षात घेऊन अशा नोंदी करण्यात तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा होईल. त्यांच्या खात्यावर असलेली थकबाकी सरकारच्या नावावर टाकली जाईल आणि शेतकºयांना खरिपाचे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक बैठक घेतली होती. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी तसेच अन्य बँकांच्या अधिकाºयांनीही त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जाहीर
केलेल्या वीस लाख कोटींच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला नेमके काय मिळणार? महाराष्ट्रातल्या शेतकºयांना
व सहकार विभागाच्या माध्यमातून कोणते लाभ मिळतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल देखील लवकरच माहिती दिली जाईल, असेही सहकार मंत्री पाटील यांंनी सांगितले.