CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं विक्रम मोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 09:07 PM2020-07-22T21:07:48+5:302020-07-22T21:09:31+5:30
CoronaVirus News: राज्यात १ लाख ३६ हजार ९८० रुग्णांवर उपचार सुरू; १ लाख ८७ हजार ७६९ कोरोनामुक्त
मुंबई – मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के झाले आहे. दिवसभरात ५ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरातील २८० मृत्यूंमध्ये मुंबईत ५८, ठाणे १६, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा ३, मीरा भाईंदर मनपा ७, पालघर १, वसई विरार मनपा ४, रायगड १, पनवेल मनपा ३, नाशिक ३, नाशिक मनपा ४, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा ३, जळगाव ८, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ३, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १८, सोलापूर ६, सोलापूर मनपा ६, सातारा २, कोल्हापूर ६, कोल्हापूर मनपा १०, सांगली १, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, रत्नागिरी ३, औरंगाबाद ४, औरंगाबाद मनपा २३, जालना १, हिंगोली १, परभणी २, लातूर २, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, अकोला १, अकोला २, बुलढाणा १, नागपूर मनपा ३ आणि अन्य राज्य/देशातील एका रुग्णाचा समावेश आहे.
मुंबईत बुधवारी १ हजार ३१० रुग्ण व ५८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या १ लाख ४ हजार ६७८ तर बळींचा आकडा ५ हजार ८७५ झाला आहे. सध्या २३ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर ७५ हजार ११८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईच्या तुलनेत अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात ३६ हजार १८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईच्या तुलनेत पुणे मनपा हद्दीत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, पुणे मनपा क्षेत्रात बुधवारी २ हजार १११ तर पुण्यात ३६२ रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ प्रयोगशाळा नमुन्यांपकी २० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ४४ हजार ९७५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणारत आहेत.